include_once("common_lab_header.php");
Excerpt for कदाचित हेच आहे प्रेम ( sample) by , available in its entirety at Smashwords

सर्पबळी

नमस्कार

मी अभिषेक अनिल दळवी .गेले दोन वर्ष मी भयकथंासाठी लिखाण करीत आहे .

लहानपणी गोष्टीं ,कथा ऐकण्याची आवड प्रत्येकाला असते तशीच मलाही होती पण जेव्हा भयकथांची वेळ यायची तेव्हा गंभीरता ,उत्कंठा ,भीती असे संमिश्र भाव ह्रुदयातून तरळून जायचे यातूनच भयकथांची आवड वाढू लागली . अधाशाप्रमाणे भयकथा ऐकणे ,वाचणे आणि मित्र मैत्रिणींना भयकथा रचवून सांगणे हा एक छंदच बनून गेला ." मुलांना घाबरवतो "म्हणून अनेकदा शिक्षकांचा ओरडा प्रसंगी शिक्षाही भेटली .पण भयकथांमधली रुचि वाढतच होती त्यानंतर " रत्नाकर मतकरी ,नारायण धारप "यां सारख्या दिग्गजांच्या कथांचे बाळकडू मिळत गेले आणि लिखाणाला प्रारंभ झाला .आईचे वेळोवेळी प्रोत्साहन मिळत होते .कथा रचून त्या फेसबूकद्वारे जगासमोर आणल्या आणि वाचकांचाही भरगोस प्रतिसाद मिळाला त्या कथांमधीलच काही निवडक कथांचा संग्रह म्हणजे भूतबंगला ..अर्पणपत्रिका

पुस्तक अर्पण करावे अश्या दोन व्यक्ति आहेत. आई आणि आजोबा आजोबांनीच मला भयकथांची आणि आईने वाचनाची ओळख करून दिली यातूनच लेखनास प्रारंभ झाला .यांना हे पुस्तक क्रूतज्ञता पूर्वक अर्पणस्वप्न

कावेरी खडबडुन जागी झाली गाडीचा AC चालु असूनही तिला दरदरुन घाम फुटला होता ती आजुबाजुला पाहू लागली बाजूलाच कुमार बसला होता ." किती भयानक स्वप्न होतं " ती एका हाताने चेहऱ्यावरचा घाम पुसत पुटपुटली कुमार गाडी चालवत चालवत तिच्याकडे पाहू लागला .

"काय गं काय झाल एवढं दचकायला ? "कुमार गाडी बाजूला घेत बोलला .

" काही नाही रे स्वप्न पडलं ..किती वाजले ? कुठं पर्यंत पोचलोय ? "कावेरीने विचारलं .

"सव्वाबारा वाजलेत अजून सहा सात तास तरी लागतील "बोलता बोलता कुमारने गाडी पुन्हा रस्त्यावर आणली .

कावेरी आणि कुमारच एका वर्षापूर्वीच लग्न झाल होतं .कुमारला नोकरीमधे रूजु होऊन एक दोन महीने होऊन गेले होते तेव्हाच कावेरीची बदली या ऑफिसला झाली.नवं शहर आईवडिलांपासून दूर राहणं यामुळे थोडी बावरली होती तिला कोणाच्या तरी मैत्रीची गरज होती आणि कुमारला हीच संधीची हवी होती त्याने कावेरीला जेव्हा पाहिलं होतं तेव्हा पासूनच ती त्याला आवडली होती .त्या दोघांची एकमेकांशी मैत्री झाली हळूहळु मैत्रीच रुपांतर प्रेमात झालं. दोघांच्याही घरातून लग्नाला आधीपासून विरोध होताच नंतर कुमाराच्या हट्टापुढे त्याच्या घरच्यांनी नमत घेतलं पण कावेरीचे बाबा शेवटपर्यंत तयारच नव्हते आणि त्याला कारणही तसंच होतं कावेरीच्या पत्रिकेनुसार तिच्याशी लग्न करणाऱ्याच्या आयुष्यात एका वर्षा आत म्रुत्युयोग होता आणि तिच्याही जीवाला धोका होता . तिच्या बाबांचा अशा गोष्टींवर गाढ विश्वास होता त्यामुळे रागाने नाही पण आपल्या मुलीच्या भविष्याच्या भीतीने ते राजी होतं नव्हते आणि पुढे कधी होतील याची शाश्वती नव्हती शेवटी कुमार कावेरीने पळून जाऊन त्यांच्या मर्जीविरुध्द लग्न केलंच .सुरूवतीला रागाने तिच्या वडिलांनी अबोला धरला पण मुलीचा संसार नीट चाललाय पाहून तो राग निवळला .आज लग्नाला एक वर्ष पूर्ण होऊन गेलं होतं वर्षभरात त्यांच्या आयुष्यात एकही वितुष्ट आलं नाही त्यांच चांगल चाललं होतं म्हणून कावेरीच्या माहेरी जाताना एक विजयी आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर होता .रविवारी सकाळी तिच्या गांवी पोहचले कुलदैवतेच दर्शन घेऊन जेवण खाण आपोटून संध्याकाळी निघाले जेणे करून रात्री प्रवास करून सकाळी पोचता येईल .कावेरी खिडकीतून आजुबाजुला पाहत होती रस्त्याच्या कडेने एक बोर्ड गेला त्यावर "काळंशेत" लिहिल होतं या काळंशेतवरून तिला काही तरी आठवलं काल परवाच तिने पेपरात एक बातमी वाचली होती या परिसरात एक मनोरुग्ण रात्रीच्या वेळी लोकांवर हल्ले करतो. पोलीस त्याच्या मागावर आहेत त्यांनी त्याच्यापासून सावधानतेचा इशाराही दिला होता .हा रस्त्यावर रहदारी अजिबात नव्हतीच . किती तरी वेळाने एखादी गाडी बाजूने जात होती .

"हा रस्ता एवढा सुनसान का वाटतोय रे ? कावेरीने कुमारला विचारले

"अग हे रस्ते सुनसानच असतात आपण शहरापासून बरेच दूर आहोत "

"तरी बाबा बोललेले इतक्या रात्रीचा प्रवास नको म्हणून "

"तूझे बाबा माझ्याशी लग्न करू नकोस असंही म्हणालेले तरीही केलस ना ?कुमार तिची थट्टा करत बोलला .

" बास बास राहू दे "म्हणत कावेरीने विषय संपवला .

खिडकीतून रस्त्याच्याकडेला एक मंदिर दिसल म्हणून तिने थोडा वेळ डोळे बंद केले तितक्यात करकचून ब्रेक लागून गाडी थांबली तिने डोळे उघडून पाहिल .कुमार गाडीचे हॉर्न वाजवत होता गाडीसमोर एक काळं मांजर होतं.गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश डोळ्यांवर पडल्याने त्याचे हिरवे डोळे अजूनच चमकत होते त्याला वाचवायच्या नादात कुमारने ब्रेक मारले होते .दोन मिनिटांनी ते रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला निघून गेल पण कावेरी मात्र थोडी भांबावली होती .कुमारने गाडी पुन्हा चालू केली

"गाडी पुढे नको नेऊस "कावेरी कुमारला अडवत म्हणाली .

"पुढे नको नेऊ पण का ?कुमारने विचारले .

"ते मांजर पाहीलस ना ?काळं मांजर आडव गेलंय "

" मग आता इथेच बसूया मांजर आडव गेलं म्हणून "कुमार वैतागून बोलला .

कावेरी थोडी हळवी होती आणि बालपण गावात गेल्याने अशा गोष्टींवर विश्वासही होता कुमारने गाडी सुरू केली न केली तोच थोड पुढे जाऊन गाडी खड़ख़ड आवाज करत थांबली .

" ओह शटट... आता हिला काय झाल " कुमार पुटपुटला .

" काय झाल " कावेरीने विचारलं .

" थांब एक मिनिटात बघून आलो " म्हणत कुमार गाडीतुन उतरुन बोनेटकडे गेला .

बोनेट उघडून पाहिल इंजिन फार गरम झाल होत रेडिएटर मधलं पानी संपल होतं . तो बोनेट बंद करून कावेरीच्या खिडकीजवळ आला .

" अगं रेडिएटर मधलं पानी संपलय बाजूला कुठे भेटातय का बघतो "कुमार बोलला .

"थांब मी पण येते "

" आता तू कुठे येतेयस तू थांब गाडीतच मी लगेच जाऊन आलो " म्हणत कुमार डिकिकडे गेला .

" संाभाळून जा " कावेरी कुमाराकडे पाहत म्हणाली .

कुमारंने डिकितुन रिकामा कॅन काढला आणि मोबाईलचा फ्लॅश चालू करून रस्त्याच्या बाजूला झाडांमधे अंधारात दिसेनासा झाला .कावेरीने एक जांभई दिली तिच्या डोळ्यावर झोप येत होती रस्त्यावर दुसर् कोणतही वाहन दिसत नव्हत म्हणून सगळीकडे शांतता पसरली होती .कावेरीने मागे सीटला डोक टेकवल इतक्यात एक जोराची किंकाळी तिथे घुमली. कावेरी दचकली तो आवाज अगदी कुमार सारखाच वाटत होता . कावेरी गाडीच्या बाहेर आली आजूबाजूला पाहिलं तर रस्त्यावर एखादं चिटपाखरूही नव्हतं. ती किंकाळी कुमारचीच होती एवढ नक्की... कुमार ज्या दिशेला गेला तिथे ती पाहू लागली पण त्या झाडांमधे आणि त्या अंधारात तो कुठेच दिसत नव्हता .कावेरीला काय करू हे समजत नव्हत तितक्यात कुमार ज्या दिशेला गेला होता तिथून तिला झाडांमागून एक आक्रुती येताना दिसली तिच्या जीवात जीव आला ती धावतच कुमारकडे निघाली पण दहा बारा पावलावरच थांबली कारण तो कुमार नव्हता .अंधारात चेहरा नीट दिसत नव्हता पण तो कुमार नव्हता तो जो कोणी होता तो डाव्या पायाने लंगड़ा होता त्याच्या डाव्या हातात काठी आणि उजव्या हातात कोयता .कावेरीला ती बातमी आठवली त्यातल त्या मनोरूग्णाच वर्णन जवळपास असच होतं . कावेरी आता पूर्णपणे घाबरली होती तो माणूस लंगडत वेगाने तिच्या जवळ येऊ लागला .कावेरी त्याच्या पासून दूर अंधारात धावत सुटली तो हि तिच्या मागे येऊ लागला आपण कुठे जातोय हे तिला कळत नव्हतं ती ठेचकाळत होती ,झाडांना आपटत होती पण धावत होती .कावेरी आता थोडा वेळ थांबली तो लंगडण्याचा आवाज आता येत नव्हता म्हणजे तो माणूस आता तिच्या पासून दूर राहिला होता .कावेरीने आपल्या चेहऱ्यावर आलेले केस मागे घेतले आणि दम खाऊ लागली .तीच लक्ष बाजूला गेलं तिथे कोणीतरी पडलं होतं तिने जवळ जाऊन पाहिल तर तो कुमार होता त्याच्या गळ्यावर वार केला होता सम्पूर्ण शर्ट रक्ताने लाल झाल होतं ते पाहून तिने किंकाळी फोडली तिने कुमारच्या जवळ जाऊन त्याच डोक आपल्या छातीशी घट्ट पकडलं . कुमारचा देह निष्प्राण पडला होता. कावेरीच रडणं त्या शांततेत अजूनच भयानक वाटत होतं .कावेरी हुंदके देत रडतच होती इतक्यात तिला पुन्हा त्या माणसाचा लंगडण्याचा आवाज येऊ लागला कदाचित त्याने कावेरीच्या किंकाळण्याचा आवाज ऐकला होता तोच ऐकून तिच्या दिशेने तो येत होता त्याचा तो जवळ येणारा आवाज ऐकून कावेरी स्वतःला सावरत उठली आणि बाजूच्या झाडामागे जाऊन लपली तो माणूस जवळपास आला होता .कावेरी तोंडावर हात ठेऊन स्वतःचे हुंदके दाबत होती तो माणूस कावेरी लपलेल्या झाडापासून दूर नव्हता कावेरी कानोसा घेऊ लागली त्या माणसाच्या तोंडून हू ..हू.. आवाज येत होता तोही दमला असावा तिने झाडाच्या मागून हळूच बाहेर पाहिलं तो माणूस अजून तिलाच शोधत होता . त्याच्या पायाजवळच कुमाराचा मोबाईल पडला होता त्याचा फ्लॅश चालू होता त्या प्रकाशात त्याच रूप आणखीनच भयानक दिसत होतं .हातात रक्ताने माखलेला कोयता ,गालफड आत गेलेला चेहरा त्यावर सफेद खुरटी दाढी, क्रुश बांधा ,वयाने म्हातारा ,खांद्यापासून उजव्या हाताची बाही फाटलेला शर्ट ,शर्टावर रक्ताचे शिंतोडे उडालेले . कावेरी इतक्या वेळाने त्याला फार जवळून पाहत होती .कावेरी मटकन डोळे बंद केले भीतीपोटी अजून काही पाहण्याची तिच्यात हिम्मतच उरली नव्हती तो माणूस थोडावेळ तिथेच घुटमळून पुढे जाऊ लागला त्याचा काठी टेकत चालण्याचा आवाज तिच्यापासून लांब जाऊ लागला त्याला दूर गेलेल पाहून कावेरीने तोंडावरचा हात काढला. झाडाला पाठ लावून हुंदके देत खाली बसली तो माणूस दूर गेल्यावर थोडी शांतता पसरली .काही तासापूर्वीच कावेरीच जग किती वेगळं होतं पण आता ..आता सगळ बदललं होतं .दोन क्षण शांततेत जात नाही तोपर्यंत तिच्या मोबाईलची रिंग वाजली त्या आवाजाने ती दचकली पण लगेच तिने खिशातून मोबाईल काढला मोबाईलचा आवाज त्या माणसापर्यंत पोहोचू नये म्हणून फोन कट करू लागली पण थरथरत्या हातांनी फोन कट होतं नव्हता उलट मोबाईलचा आवाज जास्तच येत होता शेवटी नाईलाजाने मोबाईल जवळच्या दगडावर तीनदा चारदा आपटला तेव्हा तो फुटून त्याचा आवाज बंद झाला आता थोडी शांतता पसरली. कावेरीने सूटकेचा निश्वास सोडला. आपल डोक झाडाच्या खोडावर टेकवून डोळे बंद केले तितक्यात तिला आपल्या बाजूला हालचाल ऐकू आली तीने डोळे उघडून पहिलं तर तिच्यापासून दोन फूटावर तो माणूस उभा होता तो मोबाईलचा आवाज ऐकून तिथं पर्यंत पोचला होता त्याची नजर कावेरीवरच खिळली होती त्याने जोराचा श्वास घेऊन कावेरीला मारायला कोयता उचलला आणि .............................................

कावेरी खडबडुन जागी झाली तिला दरदरुण घाम फुटला होता इकडे तिकडे पहिलं ती गाडीतच होती बाजूला कुमार होता तिला स्वप्न पडलं होतं "किती भयानक स्वप्न होतं "ती एका हाताने चेहऱ्यावरचा घाम पुसत पुटपुटली .कुमार गाडी चालवत चालवत हिच्याकडे पाहू लागला .

" काय गं काय झाल एवढं दचकायला ? "कुमार गाडी बाजूला घेत बोलला .

" काही नाही रे स्वप्न पडलं ..किती वाजले ? कुठं पर्यंत पोचलोय ? "कावेरीने विचारलं .

" सव्वाबारा वाजलेत अजून सहा सात तास तरी लागतील "बोलता बोलता कुमारंने गाडी रस्त्यावर आणली .

कावेरीला थोडं विचित्र वाटत होतं त्यांच बोलणं अगदी तसच होतं जस स्वप्नात घडलं होतं तीच लक्ष बाहेर गेलं रस्त्याच्या कडेने एक बोर्ड गेला ज्यावर " काळशेतं " लिहल होतं तो बोर्डही अगदी तसाच होता जसा तिला स्वप्नात दिसला होता .कावेरीच लक्ष बाहेरच होतं ती ते स्वप्न आठवत होती त्या बोर्ड नंतर मंदिर दिसल होतं ती लक्ष देऊन बाहेर पाहू लागली आणि रस्त्याच्याकडेने अगदी तसच मंदिर गेलं जस तिने पाहिलं होतं तिचा या वर विश्वास बसत नव्हता. तीच स्वप्न सत्यात तिच्या आयुष्यात घडत होतं .स्वप्नात जे सर्व पहिलं होतं ते आपल्या आयुष्यात खरंच घडलं तर या विचाराने तिच्या अंगावर शहारे आले इतक्यात करकचून ब्रेक लागून गाडी थांबली तिने घाबरत समोर पहिलं गाडी समोर एक काळं मांजर होतं त्याचे हिरवे डोळे गाडीच्या हेड लाइटमुळे अजूनच चमकत होते अगदी तसंच जसं स्वप्नात पाहिलेलं ........

पाठदुखी

रात्रीचे साढ़े दहा वाजले होते. बंगल्यात अंधार होता बेडरूमधला नाईट लेंप चालू होता .बेडरूमच्या बालकनीचे पडदे वार्याने हलकेच उडत होते. बालकनी समोर आरामखुर्चीत नचीकेत बसला होता.तो त्याचा आणि दिव्याचा भिंतीवरचा फोटो पाहत .दिव्या दिसायला अगदी सुंदर तिच्या सुंदरतेवरच तर नचिकेत भाळला होता त्या दोघांनाही मूलबाळ नव्हत अर्थात दीव्याने होऊ दिल नव्हतं तिला आपल्या स्वतंत्र आयुष्यात कोणाची अडचण नको होती ती जितकी सुंदर होती तितकीच विलासी आणि ऐशोआरामी.... नचिकेत आरामखुर्चीतून उठून बाल्कनीत जाऊ लागला .तिच्या या विलासी स्वभावामुळे आपण काय काय केलय याची त्याला पुरेपूर जाण होती .पार्लरमधून नंतर पार्टीला जायचय सांगून सहा वाजता घरातून बाहेर पडली होती तिचा अजून पत्ता नव्हता हे नेहमीच होत. तीच सोशियल वर्क ,मीटिंगच्या नावाने दिवस रात्र इथे तिथे भटकन चालु असायचं ... ती असतानसुद्धा त्याला एकट एकट वाटायच .

"आअ ...आई "नचिकेतत्या पाठीतून जोरात कळ गेली त्याला एक दीड महिन्यांपासून पाठदुखीचा त्रास सुरू झाला होता .नुकतीच वयाची तीसावी ओलांडलेल्या तरूणाला अस पाठीत दुखण नवलच होतं. आधी अधून मधून कळा यायच्या नंतर नंतर वारंवार येऊ लागल्या आता तर दिवस रात्र दुखण चालूच होतं किती डॉक्टर ,स्पेशलिस्ट चालू होते त्यांच्या मते नचिकेतला काही झालच नव्हतं रिपोर्ट्स सगळे नॉर्मल ...पण त्रास जात नव्हता पेन कीलर घेतल्यावर थोडं बरं वाटायचं .

खालून गाडीचा आवाज आला दिव्याची गाडी गेटमधून आत येत होती दिव्या त्यातून उतरली. उंची साडी ,भडक मेकअप ,दागिने ती बंगल्याच्या दाराकडे येऊ लागला तिला पाहून नचिकेत जिन्याजवळ चालू लागला तिच्याकडे लॅच होती पण सगळ्या बंगल्यातली लाईट बंद होती ती अंधारात अडखळु नये म्हणून नचिकेत जिन्याकडे येऊ लागला .तो येई पर्यंत ती घरात येऊन जिन्यापर्यंत पोचली तो वरतीच थांबला जिना नव्या पद्धतीचा होता त्याला रेलिंग नव्हते. दिव्या एक हाताने भिंतीचा आधार घेत अंधारात चाचपडत वर येत होती वरआल्यावर समोरच नचिकेत उभा होता त्याला पाहून तिने एक स्माइल दिली पण..पण लगेच तिच्या चेहऱ्यावरच हसू मावळल ,डोळे मोठे झाले आणि तिने जोरात किंकाळी फोडली तिच्या किंचाळल्याने तो दोन पावलं मागे सरकला .

" अगं घाबरतेस काय मी नचि.....थांब लाइट लावतो "म्हणत तिच्या जवळ जाऊ लागला

" ......पुढे नको येऊस तिथेच... तिथेच थांब "भीतीने तोंडातून शब्द फुटत नव्हते पण कशीबशी बोलली .

दिव्याचे डोळे विस्फारले होते ती हळु हळु नचिकेतपासून मागे सरकू लागली .ती इतकी का घाबरलीय हे नचिकेतलाही कळत नव्हतं.

"अगं अस काय करतेस "शेवटी न रहावुन त्याने आवाज चढवून विचारलच .

"तू ..तूझ्या पाठीवर "त्याच्या खांद्याकडे बोट दाखवत बोलली .

दिव्या हळु हळु मागे सरकत होती

"पाठीवर काय ?"नचिकेत वैतागून बोलला .

दिव्या मागे सरकत सरकत जिन्याच्या कडे पर्यंत पोचली जिन्याला रेलिंग नव्हतं इतक्यात तिचा तोल जाऊन सरळ खाली हॉलमधे पडली डोके टीपॉयवर आपटून रक्त वाहू लागलं नचिकेतने खाली आला तिच्या डोक्याला आणि मानेला जखम झाली होती लगेच तिला हॉस्पिटलमधे हलवल.

आज या घटनेला दोन दिवस झाले. दिव्या पडली आणि डोक्याला जबर मार लागला, टीपॉयच्या काचा मानेत घुसल्या रक्तही भरपूर गेलं तिला हॉस्पिटलमधे नेई पर्यंत तिने प्राण सोडले .आज नचिकेत बंगल्याच्या टेरेसवर उभा होता आकाशात अर्धचंद्र दिसत होता, थंड वारा वाहत होता ,टेरेसच्या दोन कोपऱ्यात दोन छोटे लेंप जळत होते,हातात व्हिस्कीचा ग्लास होता .नचिकेत भरपूर उदास होता.तो आणि त्याचे तीन पार्टनर एकत्र या शहरात रहायला आले .एकाने आत्महत्या केली, एकाला हार्टअटॅक आला आणि दिव्याच असं झाल काहीच चांगल होत नव्हतं .हळु हळु त्याचा जीवन क्रम डोळ्यांसमोरून जाऊ लागला .

वडील त्याच्या लहानपणीच वारले आईने कष्टाने वाढवलं शिक्षण पूर्ण केल बँकेत चांगली नोकरीही लागली आईने आनंदाने डोळे मिटले .नंतर नचिकेतच्या एकाकी आयुष्यात दिव्या आली .मैत्रीच रुपांतर हळूहळू प्रेमात झाल आणि लवकरच लग्नही झाल .नचिकेतला वाटलं दिव्या आता तरी सुधारेल पण नाही लग्नानंतर कोणतीच जवाबदारी ती निभावत नव्हती तीच बेबंद वागणं दिवसेंदिवस वाढत चाललं होत. तीचे शौक बँकेच्या पगारात पूर्ण होत नव्हते ह्याच्याकडून पैसे उसने घे त्याच्या उधाऱ्या हे वाढतच चाललं होतं तेव्हाच त्याची ओळख बँकेतल्या चंद्रकांत नावाच्या सहकार्याशि झाली तो वयाने नचिकेतपेक्षा पंधरा सोळा वर्ष मोठा होता त्याला ही पैशांची लालूच होतीच त्या दोघांची ओळख नंतर विक्रम आणि प्रतापशी झाली विक्रम आणि प्रताप आधीपासून गुन्हेगारी विश्वात मुरले होते चौघांनी मिळून बँक लुटायचा प्लॅन बनवला .त्या साठी त्यांना बँकेचा सेक्यूरिटी इनचार्ज एकनाथला सामील करायची गरज होती. एकनाथ ईमानदार होता पण परिस्थिती पुढे हतबल होता त्याच्या मुलाच्या ऑपरेशनसाठी पैशाची गरज होती .पाचही जणांनी मिळून बँक लुटली आणि बँक लूटल्यावर लगेच ते चौघे गायब झाले .पोलिसांच्या भीतीने कोणीही बाहेर येत नव्हतं आणि पैशाच्या वाटण्याही झाल्या नव्हत्या. एकनाथला ऑपरेशनला पैसे नाही मिळाले म्हणून त्याचा मुलगा दगावला ते पाहून त्याच्या बायकोनेही हाय खाल्ली .काही दिवसांनी चौघे पैशाच्या वाटणीसाठी विक्रमच्या मित्राच्या फार्महाउसवर जमले सोबत सेलिब्रेशनसाठी दारू होतीच तेवढ्यात तिथे एकनाथ आला तो कदाचित ह्यांच्या पाळतीवरच होता त्याच असं अचानक येणं चौघांना अनपेक्षित होतं.पैसे न मिळाल्याने त्याच्या मुलाचा आणि बायकोचा जीव गेला म्हणून तो रागातच होता आणि हे लोक असे पार्टी करताना पाहून त्याचा पारा आणखीनच चढला .बँकेतल्य चोरीची पोलीसांना कबुली देण्याची धमकी देऊन तेथून तो निघाला हे चौघेही त्याला पकडायला निघाले त्याला पकडलाही पण तो काहीच ऐकायला तयार नव्हता त्याला पैशाची हाव नव्हती पण आपल्या मुलासाठी तो या चोरीत सहभागी झाला होता तो मुलगाच आता ह्यात नव्हता आणि सर्वाला हे चौघे जवाबदार होते .तो काही ऐकून घेत नाही हे पाहून सर्व त्याला मारू लागले ,तुडवू लागले . प्रत्येकाच्या डोक्यात दारू भिनली होती त्याला इतका मारला की त्यातच त्याचा म्रुत्यू झाला .फार्महाउसच्या मागे जंगल होतं त्याला एकेकाने पाठीवर घेत जंगलात आणलं आणि गाडल .

नंतर चोघेही दुसऱ्या शहरात रहायला आले .बंगले घेतले ,गाड्या घेतल्या, बिझनेस सुरू केला पण एकाच्याही आयुष्यात सुख नव्हतं पहिल्या सहा महिन्यातच प्रतापने आत्महत्या केली. चंद्रकांत तर ऑफिसला जायची तयारी करत होता केस उगवताना आरशात काय दिसल कोणास ठाऊक त्याला तीव्र हार्टअटॅक आला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्या दोघांनाही मरायच्या काही दिवस आधी पाठदुखी सुरू झाली होती .नचिकेतला अस्वस्थ वाटत होतं पाठीच दुखंण तर होतंच आपल्यालाही पाठदुखी आहे कदाचित आता आपण ......त्याने लगेच तो विचार झटकुण टाकला .मध्यरात्र उलटून गेली होती .नचिकेत टेरेसवरून बंगल्यात जाण्यासाठी दरवाजाकडे वळला इतक्यात त्याच लक्ष बाजूच्या काचेच्या खिडकीकडे गेल खिडकीत त्याच प्रतिबिंब दिसत होतं त्याच्या पाठीवर काही तरी होतं .त्याने जवळ जाऊन निरखून पाहिलं त्याला धक्काच बसला त्याच्या हातातून व्हिस्कीचा ग्लास सुटला आणि खळकण फुटला त्याचा श्वासोच्छ्वास वाढू लागला कारण त्याच्या पाठीवर त्याच्या पाठीवर एकनाथ होता अगदी त्याच अवस्थेत जेव्हा त्याच प्रेत पूरायला नेताना एकेकाने पाठीवर घेतलेलं .नचिकेतला आता त्याच्या पाठदुखिच ,चंद्रकांतच्या हार्ट अटॅकच आणि दिव्याच्या घाबरण्याच कारण कळत होत ......त्यांनीही तेच पाहिल असणार जे नचिकेत पाहत होता ..... नचिकेतच्या नजरा त्याच्या वरून हलत नव्हत्या. त्याचे सफेद हात नचिकेतच्या खांद्यावरुन पुढे आले होते ,त्याचा चेहरा नचिकेतच्या चेहऱ्याच्या बाजूलाच होता, कपाळावर उभी खोच दिसत होती जी त्याला मारतेवेळी आलेली ,जबडा एका बाजूने पूर्ण निखळला होता म्हणून तोंड वाकड दिसत होतं आणि डोळ्याच्या जागी सफेद बूबूळ जी नचिकेतवर रोखलेली होती .नचिकेत भितीने मागे जात जात बंगल्याच्या कठ्ड्यापर्यंत पोचला .................................तीव्र किँचाळी बंगल्याच्या आवारात घूमली .

नशेमधे नचिकेत टेरेसवरून पडला असेल असा पोलीसांनी निष्कर्ष काढला पुढच्या तपासासाठी विक्रमला पोलीस स्टेशनला बोलावलं तो एकटाच पार्ट्नर आता उरला होता. विक्रमची गाडी पोलीस स्टेशन समोर येऊन थांबली विक्रम गाडी तून उतरला. आई .............त्याच्या पाठीतून एक जोरात कळ गेली कदाचित.. कदाचित त्याचीही सुरू झाली होती "पाठदुखी " शेवटची ..भूतबंगला

कर्र्र कर्र्र ....हलणाऱ्या आराम खुर्चीचा आवाज बेडरूममधे घुमत होता. त्यावर शशिकलाबाई मागेपुढे आरामात हेलकावे घेत होत्या भिंतीवरच्या भल्यामोठ्या घड्याळात बारा वाजून पाच मिनीट झाली होती बंगल्यात अंधार होता.शशिकला बाईंची नजर त्यांच्या भिंतीवरच्या फोटोवर होती. लग्नानंतर काही दिवसांनी हा फोटो काढला होता हातात हिरवाचूड़ा , गळ्यात दागदागिने ,डोक्यावर घेतलेला पदर चेहऱ्यावर तजेल कांती त्यांना आपले पूर्वीचे दिवस आठवत होते. नवरा बायको एक मुलगा एक मुलगी असं चौकोनी कुटुंब. नवऱ्याच अकाली निधन झालं पण न डगमगता हिम्मतीने शशिकला बाईंनी पुढे व्यवसाय चालवला मूल मोठी झाली त्यांची लग्न केली ती परदेशात गेली आणि तिथेच स्थायिक झाली. त्या नंतर शशिकला बाई एकट्या पडल्या त्या पडल्याच मागे एकदा जिन्यावरुन घसरुन पडल्या डोक्याला खोच पडून रक्तही फार गेलं पण मदतसुध्दा वेळेवर भेटली नाही .

तो बंगलाही मुख्य रस्त्यापासून , रहदारीपासून लांब त्या मुळे सगळीकडे नीरव शांतता... अंगणात काही खुडबुड झाली. शशिकलाबाई हळुवार चालत खिडकीपाशी आल्या कंम्पाउंड वॉलच्या बाजूला दोन तीन सावल्या वळवळताना दिसत होत्या कोणीतरी वॉलवर चढण्याचा प्रयत्न करत होतं एकाने वॉलवर चढून आत उडी मारली वयाने मध्यमसा क्रुश शरीरयष्टी ,अंगात बंडी धोतर , डोक्यावरुन घेतलेलं कांबळ आणि एका हातात पहार कडी उचकटण्यासाठी कदाचित तो चोर होता .त्याच्या पाठोपाठ त्याच्या दोन साथीदारांनेही उडी मारली .त्या दोघांची शरीरयष्टी पहिल्याच्या सारखीच.. दुसऱ्याच्या हातात लांब लचक बॅटरी आणि तिसऱ्याच्या कमरेला मात्र धारदार कोयता लटकत होता .

त्यातला पहिला बोलला "नाऱ्या काढ बा लवकर एक एक घोट मारू "

नाऱ्याने आपल्या बंडीच्या खिश्यातुन चपटी काढली त्याचा एक घोट घेऊन हनम्याकडे फिरवली .

"सर्ज्या खबर पक्की हाय ना घरात कोनबी नाय ते ?"दुसरा बंगल्याकडे पाहत बोलला .

" न्हाय रे कोनबी नाय आणि आसलच तर काय करायच ते बी आपल्याला माहितीच हाय की "सर्ज्या आपल्या कमरेवरच्या कोयत्यावर हात फिरवत बोलला ."चला कामाला लागा "त्यांच्या कुजबुजण्याचे आवाजवर शशिकला बाईपर्यंत थोडेफार ऐकु आले .आजकाल आसपासच्या परिसरात चोरी ,दरोडे वाढले होते .

शशिकलाबाई आपल्या खुर्चीवर येऊन बसल्या त्यांच्या बेडरूमचा दरवाजा बंद होता .शांततेत आवाज चांगले ऐकु येत होते .हॉलच्या खिडकीचा बोल्ट खटकन तुटल्याचा आवाज झाला त्या बरोबर खिडकीचे दरवाजे खाडकन उघडले एकेक करत तिघांचेही पावलंचे आवाज फरशीवर उमटले .तिघांची पावले हॉलभर फिरत होती इतक्यात कोणाचातरी धक्का लागून कोपऱ्यातला फ्लॉवरपॉट खाली पडला खळकन फुटला ...."हनम्या बैला एक दिस तूझ्यामुळे आमचाबी जीव जाणार हाय "सर्ज्याचा आवाज हॉलमधे घुमला .एकाने हॉलमधल्याच बेडरूमचा दरवाजा खोलल्याचा आवाज आला तिघेही आत आले आत पलंग ,एक टेबल ,दोन खुर्च्याशिवाय काही नव्हतं तिघांनी पलंगाचे कप्पे उघडून बेड उलटा पालटा करून पहिलं तिथे काही नव्हतं .तिघेही एक एक करून बाहेर आले समोरच्या रूमकडे वळले पण तिथे काय मिळण्याची शक्यता नव्हती कारण तिथल फर्निचरही केव्हाच हलवल होतं .तिघेही वरच्या मजल्यावर जायला पायऱ्यावर चढू लागले .जिन्याला सफेद रंगाच्या टाइल बसवल्या होत्या त्यावर लाल रंगाचे पुसटसे रक्ताचे डाग होते कधी काळी पडलेले पण नीट न पुसल्याने तसेच राहिले होते .तिघेही एका मागोमाग एक पायऱ्या चढत वरच्या मजल्यावर आले .शशिकला बाईंच्या बाजूच्या बेडरूमच्या दरवाजा पर्यंत येऊन पोचले .दरवाजाचीकडी वर खाली फिरवण्याचा आवाज आला दरवाजा लॅच लॉक होता नंतर दोन तीन वेळा दरवाजावर जोरात धक्के दिले गेले आणि तो बाजूच्या बेडरूमचा दरवाजा धाडकन उघडला. तिघे आत आले पूर्ण रूममधे बॅटरी मारली कोपऱ्यात एक कपाट होतं ते त्या कपाटाजवळ आले .हनम्याने हातातली पहार कपाटाच्या दोन दाराच्या फटीत घुसवली आणि रात्रीच्या शांततेत दरवाजा पेचण्याचा आवाज येऊ लागला. कपाट जुनं होतं पण मजबूत होतं .तिघांनी जोर लावल्यानंतर दरवाजा तुटून बाजूला पडला पण कपाटही पूर्ण खाली होतं त्यात काहीच नव्हतं .

"आरं पूर घर शोधल काय बी नाय कस ? "नाऱ्याने विचारलं

"न्हाय रे इतका मोठा बंगला असा खाली कसा असल ? "हनम्या विचार करत बोलला .

शशिकला बाईंच्या बेडरूममधून पुन्हा खुर्चीचा कर्र कर्र आवाज येऊ लागला तो आवाज ऐकून सर्ज्याच्या डोक्यात प्रकाश पडला .

"आरं बाजूची खोली तर बघायचीच राहिली "सर्ज्या त्या दोघांकडे पाहत पुटपुटला.

ते दोघे बाकीचे ड्रॉवर धुंडाळण्यात बेड उलट पालट करण्यात व्यस्त होते म्हणून सर्ज्या एका हातात बॅटरी घेऊन एकटाच निघाला .

त्यांच्या हालचालींचे आवाज शशिकला बाईंच्या रूमपर्यंत सहज येत होते. बाजूच्या रूममधे तिघेजण घुटमळत होते पण त्यातल्या एक बाहेर आला होता आणि त्यांच्या रूमच्या दिशेने येत होता. त्याच्या पावलंचा आवाज रूमच्या दरवाजासमोर येऊन थांबला जे कोणी होतं ते त्यांच्या रूमसमोर होतं .आणि बॅटरी दरवाजावर रोखली जमिन आणि दरवाजामधल्या फटीतून बॅटरीचा प्रकाश दिसत होता. दरवाजावर एक जोरदार धक्का बसला आणि दरवाजा उघडला . शशिकलाबाईंच तोंड दरवाजाच्याच दिशेला होते .दरवाजात एक माणूस उभा होता ज्याच्या बॅटरीचा प्रकाश सरळ त्यांच्यावर पडत होता तो माणूस त्यांना बघून जागीच खिळला त्याचा श्वास भीतीने गळ्यातच अडकला . हातातली बॅटरी खाली पडली आणि बंद झाली तो जोरात ओरडला "निघा रं.... इथून ....निघा.... "अस म्हणत तो जिन्याकडे धावला आणि जिन्यावरुन त्याचा धडपडत खाली जाण्याचा आवाज आला .त्याला अस पळताना पाहून हनम्या आणि नाऱ्या सावध झाले .हनम्या हातातली पहार सावरून त्या रूमकडे जाऊ लागला त्या पाठोपाठ नाऱ्याही जाऊ लागला ते दोघेही त्या रूमच्या दरवाजाजवळ आले .आतल द्रुश्य पाहून दोघेही भांभावले हनम्याच्या हातातली पहार गळून पडली दोघांचेही पाय लटपटू लागले .आत एक बाई खुर्चीवर बसली होती तिच्या कपाळाला मोठी खोच पडली होती त्यातून निघणार रक्त तिच्या चेहऱ्यावरुन साडीवर ओघळत होतं, रक्ताने तिचा एक डोळा पूर्ण लाल झालेला तर दुसरा पूर्ण सफेद होता ती ह्यांच्याकडेच पाहत होती .ते सर्व पाहून कसेबसे ते दोघे जिन्याकडे धावले जिन्यावरुन धडपडत अंधारात खिडकी गाठली आणि कसबस स्वतः ला बंगल्याबाहेर लोटल .बंगल्यापासून दूरवर त्यांच्या धावत जाण्याचा आवाज येत होता .काहीवेळाने बंगल्यात नीरव शांतता पसरली .शशिकला बाईं पुन्हा झोके घेऊ लागल्या त्यांची नजर पुन्हा आपल्या फोटोवर खिळली .काळानुसार त्यावर धूळ जमा झाली होती कोपऱ्यात कोळ्याच जाळं दिसत होतं आणि सर्वात महत्वाच म्हणजे त्या फोटोवरचा चंदनाचा हार जुना होऊन केव्हाच तुटून गळून पडला होता ....जनोबा

माझा जन्म मूळचा गावचा पण माझे शिक्षण मुंबईतच झाले . आणि नोकरी ही एथेच . गावच घर,शेती सर्व वडील पहायचे भाऊ कधी कधी मदतीला इकडून जात असे . आई वारली . नंतर गावचा आणि माझा काही सबंध आला नाही . वडिलांच्या मर्जी विरुद्ध लग्न केल होतं त्यामुळे त्यांनीही कधी बोलावलं नाही त्यांच्या म्रुत्यु नंतर भावा बरोबर कार्याला गावाला गेलो एवढंच . त्यां नंतर एका वर्षानी भावाला गावाहून नोटिस आली की आमची जमिनी बाबत काही सरकारी व्यवहार आहेत . बाबांनंतर ती जमीन अशीच पडून राहीली होती त्यामुळे आम्ही ती विकण्याचा निर्णय घेतला . पण भावला सुट्टी मिळणे शक्य नव्हते . त्यात वहिनी गरोदर होती त्यामुळे मलाच जाव लागणार होतं . त्यानुसार मी वीस दिवसांची रजा घेतली आणि निघायला तयार झालो .दादाने काही गावातल्यांचे नंबर दिले जेणें करून मला मदत होईल आणि काही हॉटेल्सचे पत्ते दिले आणि घरी न जाता हॉटेलवर राहा असे सुचविले . स्वतः चे घर असताना हा मला हॉटेलमधे रहायला का सुचवतोय हे कळत नव्हते . मी त्याबद्दल विचारले तेव्हा त्याने तूझी गैरसोय होईल,घर बरेच दिवस बंद आहेत अशी उडवा उडविची उत्तरे दिली . पण स्वतः चे घर असताना अशा हॉटेलवर राहणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा होता .

मी गावाला गेलो थोडे हवा पानी बदलले म्हणून बरे वाटत होते . घरच्या किल्ल्याजवळच होत्या . घर चांगले प्रशस्त होते पाच खोल्या,अंगण,मागे विहीर पण घर बंद असल्याने थोडी धूळ साचली होती . एक दोन माणसे बोलवून मी साफ सफाई करून घेतली आणि रहायला तयार झालो आता फक्त स्वयंपाकाचा प्रश्न होता .दिवसाचा वेळ तालुक्यात कामाला जाणार होता फक्त रात्रीच्या जेवणाचा प्रश्न होता . त्यासाठी मी एका दोघांना सांगून ठेवले कोणी भेटत का ते पहायला पण दोन तीन दिवस कोणीच आले नाही का ते कळत नव्हते . एकदा दोनदा दादाला फोन केला .मी त्या घरात राहतोय हे ऐकून तो चिडलाच त्याने बजावुन सुध्दा मी तेथे राहतो हे त्याला आवडले नव्हते आणि मला कारण ही सांगायला तयार नव्हता मीही खोदून विचारल्यावर त्याने सांगितले त्या घरात आत्म्याचा वावर आहे आणि जरी तुला तेथे रहायचे असेल तर कोणालातरी सोबत घेऊन रहा असे म्हणून रागाने फोन ठेवला . आता आता मला कळू लागले होते की घरी कोण काम करायला तयार का नाही ते आमच्या घराबद्दल गावातल्यांच्या मनात कदाचित गैरसमजूत होती . कारण मी इतके दिवस राहत असताना मला तर असे काही जाणवले नाही मग हे सर्व काय आहे असच विचार करत मी संध्याकाळपर्यंत घरी आलो . तेव्हा मागच्या खुडबूड झाली मागे जाऊन पाहिलं तर दारात एक म्हातारा माणूस उभा होता . मळकट धोतर ,सफेद बंडी , शिडशिडित शरीरयष्टी असा त्याचा अवतार त्याला नीट बघितल्यावर आठवले हा तर बाबांचा नोकर जनोबा ...पुर्वी बाबा मुंबईला येत असताना त्यांच्याबरोबर येई . त्याची विचारपूस केल्यावर कळले की आता तो दिवसा कोणा कोणाकडे तरी काम करतो माझी जेवणाची गैरसोय होतेय हे त्याला कळले म्हणून तो आला.तो आला ते एक बर झालं माझा असाही रात्रीच्या जेवणाचा प्रश्न होता त्यात सोबतही झाली होती . माझे गावाला दिवस चांगले चालले होते सकाळी तालुक्यात जायचे संध्याकाळी येताना गाव हिंडत यायचे रात्री जनोबाच्या हातचे जेवण जेउन झोपायाचे . पण एके दिवशी असे काही घडले जे मी कधीच विसरू शकणार नाही त्या रात्री बाराच्या टोल्याने मला जाग आली माझेलक्ष खिडकीतून बाहेर गेले मी पाहिले तर विहिरिकडे कोणीतरी जात होते कोण आहे ते काही कळत नव्हते मी घरातून बाहेर येऊन त्याच्या मागोमाग गेलो तर ते जे कोणी होते त्याने विहिरीत उडी मारली . मी लगेच त्या विहिरीजवळ गेलो आणि माझा ही तोल जाऊन विहिरित पडलो आणि मला जाग आली ते स्वप्न होते मी तेव्हा अगदी घामघुम झालो होतो ते स्वप्न विसरून मी झोपायचा प्रयत्न करू लागले इतक्यात बाराचे टोले पडले अगदी मगाससारखेच आणि दरवाजाची कड़ी आतून खोलल्या सारखा आवाज आला. घरात फ़क्त मी आणि जनोबाच होतो. हा आता कशाला बाहेर गेला हे कळत नव्हते म्हणून मीही घरातून बाहेर आलो तो विहिरीच्या दिशेने जाऊ लागला मीही त्याच्या मागोमाग गेलो त्याचा चेहरा दिसत नव्हता पण घरातून बाहेर पडला म्हणजे जनोबाच असावा. मी त्याच्या मागोमाग चालू लागलो तो विहिरिजवळ येऊन थांबला आणि अचानक त्याने विहिरित उडी घेतली आणि एक जोरात किंकाळी ऐकू आली. मी मागोमाग जाऊन पाहिले तर विहिरिच्या कठड्या वर त्याचे डोके आपटून रक्त सांडले होते आणि त्याचा देह पाण्यावर तरंगत होता. मी हे बघून अक्षरशः घाबरलो आणि शेजार्याना बोलवायला धावलो तितक्यात माझे लक्ष जनोबा झोपलेल्या खोलिच्या खिडकीकडे गेलं आत कोणीतरी होतं . मी जवळ जाऊन नीट पाहिले तर जनोबा आत गाढ झोपला होता मग आता मी बघितले ते काय होतं ? तो कोण होता ? त्याचा चेहरा नीट दिसला नव्हता पण तो जो कोणी होता तो घरातून कसा बाहेर पडला म्हणून मी परत पाहायला विहिरी जवळ गेलो तर तिथे पाण्यात काहीही मगाशी जिथे रक्त सांडलेल तिथे आता रक्ताचा एक थेंबही नव्हता माझ डोक आता गरगरायला लागल होतं त्याच भीतीत मी परत येऊन झोपण्याचा प्रयत्न केला रात्री उशीरा कधी झोप लागली सकाळी उशीराने जाग आली तो पर्यंत जनोबा निघून गेला होता आता तो भेटनार संध्याकाळी . रात्रीची गोष्ट डोक्यातून जात नव्हती मी पुन्हा विहिरित येऊन बघितले तर तिथे कोणतेही रक्ताचे डाग नव्हते पाणी ही स्वच्छ होते . हे काय चालले आहे काही कळत नव्हते तेवढ्यात माज्या लक्षात आले की काल अमावस्या होती अशा दिवशी असे भास होतात असा विचार करून मी ते सर्व विसरायचा प्रयत्न करू लागलो काही दिवसांनी इकडचे काम ही संपले आणि मी परत यायला तयार झालो. येताना जरा जास्तच पैसे जनोबच्या हातावर ठेवले आणि घराची काळजी घे असे बजावले त्यावर त्याने " मालक जिवंत असे पर्यंत सेवा केली..... तर मरणांनंतर नाय करणार का ? " उदगार काढले .

" हो बाबांची ते असे पर्यंत तू भरपूर सेवा केलीस तू होतास म्हणून तर सर्व नीट चालु होतं ..चल " असे म्हणून मी निरोप घेतला आणि मुंबईला आलो . आता कधी एकदा दादाला भेटतोय आणि त्याची खेचतोय असे झाले होते . मी दादाला भेटायला गेलो. मला पाहून त्याने प्रश्नांचा भडिमार सुरू केला घर कसे आहे ?

भीती नाही वाटली ना ?

सोबतीला कोण होते ? मी त्याला शांत पणे सांगितले घरात भूत काय भुताचे नखही नव्हते . त्यात सोबतीला जनोबा होता मग भिती कसली माझे बोलणे ऐकून त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला . वहिनिहि घाबरली दोघेही एकमेकांकडे बघू लागले .मी त्याला याचे कारण विचारले तेव्हा त्याने जे काही सांगितले ते ऐकून माझाच चेहरा पांढरा पडायची वेळ आली त्याच्या मते तू म्हणतोयस भुताच नखही नाही बघितलंस मग राहिलास कोणा बरोबर ?? जनोबाचा बाबांच्या म्रुत्युच्या एक महीना आधीच घरामागच्या विहिरित पडून म्रुत्यु झाला पण अजूनही अनेकांना घरात तो दिसतो . बाबांनाही दिसायचा म्हणून मी तुला तेथे नको राहुस सांगितले होते हे सर्व ऐकून माझा मेंदू बधिर झाला आणि कानात फ़क्त जनोबाचे वाक्य घुमत होते .

" मालक ...... जिवंत असे पर्यंत सेवा केली मग मरणांनंतर नाही करणार का ? " तेव्हा तो बाबांच्या नाही कदाचित स्वतः च्या मरनाबद्दल बोलत होता.सर्पबळी

आज एका महिन्यानंतर त्या बंगल्यासमोर एक सफेद बॅगस्टर गाडी येऊन थांबली त्यातून एक इसम उतरला . इन केलेला पांढराशुभ्र इस्त्रीचा शर्ट,काळी पँट ,चकचकीत बूट ,भरदार मिश्या असा काहीसा रुबाब.... त्याला पाहून गणपा बाहेर आला .

"माफ करा सायेब जरा उशीरच झाला गाडी पाठवायला "गणपा बोलला .

"जरा उशीर दहा मिनट वाट पहात होतो मी.. वेळेच भान बाळगा जरा चला उचला ते सामान" धार धार आवाज घुमला त्यांच्या पाठोपाठ गणपा ती बॅग घेऊन आत आला .ते अधिकारी बदली होऊन या बंगल्यात आले होते . किती तरी दिवसांनी हा बंगला उघडत होता बंगला तसा छोटा होता पण ऐसपैस होता दरवाजा समोर मोठा हॉल , मधोमध डायनिंग टेबल त्यापुढे किचन उजव्या बाजूला जीना ,वरती दोन बेडरूम . गणपा ने सगळ आवरल होत पण .कोणत्याही गोष्टीतून चुका काढण्याची चव्हाणांची सवय जाणार होती ?शेवटी कपाटावरुन गणपाला ओरडा भेटलाच .दुसयादिवशीपासून ते ऑफिसला जाणार होते म्हणून आजच सगळी आवरा आवर करून मोकळे झाले दुपारच्या जेवणानंतर एक चांगली झोप झाली त्यामुळे थकवा दूर झाला .संध्याकाळी गणपाने दिलेला चहा पीत कादंबरी वाचता वाचता कसा वेळ गेला कळलंच नाही खिडकीतून पाहिल तर अंधार पडला होता थंडी थोडी वाढली होती . अजून एक चहा प्यायची तलप आली म्हणून गणपाला हाक मारली तर हू नाही का चु नाही .अजून दोन तीन हाका मारल्या पण काहीच प्रतिसाद नाही हे पाहून रागाने चव्हाण रूमच्या बाहेर आले जीना उतरून खाली आले तर गणपा किचनमध्येही नव्हता सगळा बंगला फिरले पण कुठेच नाही म्हणून बाहेर आले तर चौकीदाराने सांगितल की गणपा मघाशिच गेला .हे ऐकून चव्हाणांना थोडा राग आलाच.

"असा कसा गेला काही विचारण नाही सांगणं नाही... बेशिस्त भरलेत सगळे "असे काही बडबडत किचन मधे आले .तर किचनमधे सर्व स्वयंपाक गणपाने करून ठेवला होता .हे पाहून थोडा राग शांत झाला बंगल्यात थोड्या फेऱ्या मारून ते जेवायला बसले .स्वःतची काम स्वःत करायची त्यांना सवय होती कारण कामानिमित्त इतक्या ठिकाणी बदल्या झाल्या होत्या की ही सवय लागूनच गेलेली होती रात्री भांडी बेसिनमधे टाकली आणि रूमकडे जायला जिना चढनार तेवढ्यात किचनमधून काही तरी खसखसण्याचा आवाज आला दोन सेकंद थांबून चव्हाण ते ऐकू लागले नंतर दुर्लक्ष करून पुढची पायरी चढणार तेवढ्यात पुन्हा तोच आवाज आणि त्यानंतर कोणतं तरी भांड पडल्याचा आवाज आला ते पाहण्यासाठी पुन्हा जीना उतरून किचनमधे गेले आणि लाइट लावली तर तिथे एक तांब्या पडला होता .खिडक्या बंद होत्या तरी पण हा तांब्या कसा पडला हे त्यांना कळत नव्हत तो परत ओट्यावर ठेऊन ते रूममधे आले रूमचा दरवाजा बंद केल्या केल्या पुन्हा तोच सरपटण्याचा आवाज दरवाजा बाहेरून आला म्हणून दरवाजा उघडून बघितलं तर बाहेर काहीच नव्हत शेवटी दरवाजा बंद करून ते झोपायला गेले झोपही लगेच लागली .रात्री अधून मधून दरवाज्याच्या बाहेरून आवाज येत होते पण प्रवासाच्या थकव्याणे झोप एवढी आली होती की बाहेर काय चाललय हे बघायला कंटाळा आलेला .सकाळी गणपाच्या दरवाजा ठोठावल्याने जाग आली .फ्रेश होऊन खाली आले तर नाश्ता टेबलावर तयार होता.

"काय रे गणपा रात्री कुठे होतास ...जाण्यापूर्वी सांगता येत नव्हतं "

" नाही मालक काल जेवणं बनवायला लय येळ लागला अंधार पडतच आला होता म्हणून लगीच गेलो "

" ठीक आहे पण आज रात्रीपासून थांबत जा "

" मालक तेवढं सोडून काय बी बोला "

" का ? "

" म्हण्जे ते ...ते ...माझी बायको आजारी असते ना म्हणून "

" बर पण जेवण बनवूनच निघ .."

शेवटी नाश्ता वैगरे करून चव्हाण ऑफिसला गेले तिथे चांगल स्वागत केल गेल्या गेल्या मस्त एक चहा मागवली चहा घेऊन येताना आणि ठेऊन जाताना शिपाई एका वेगळ्याच नजरेने त्यांच्याकडे पाहत गेला रिकामा कप घ्यायला त्यानी पुन्हा त्याला बोलावलं तेव्हा शिपायने विचारल "सायेब काल झोप चांगली लागली ना ?

" का ? नाही त्या बंगल्यात झोप चांगली लागत नाही "

" म्हणजे ? "

" नाही काही नाही सहजच " अस त्यांना टाळत तो निघून गेला .

आज दिवस तसा चांगला गेला ते घरी आले तर गणपा जेवणं बनवून केव्हाच गेलेला होता . जेवणं घेऊन टेबलावर जेवायला बसणार तेवढ्यात कोणीतरी सरपटत किचनमधे जाण्याचा आवाज आला म्हणून जेवणं तिथेच सोडून ते किचनमधे बघायला गेले तर तिथे काहीच नव्हतं कोणीतरी मांजर वैगरे असेल म्हणून ओट्याखाली वैगरे नीट बघितल तर तिथेही काही नाही म्हणून किचनची खिडकी पुर्ण बंद करून जेवायला बसले तेव्हा पाहिलं तर खिरीचा रंग निळा पडला होता सगळी खीर खराब झाली होती हे सगळ काय चाललय त्यांना कळत नव्हतं शेवटी बाकीच जेवणं जेऊन झोपायला गेले. डोळा लागतो न लागतो तेवढ्यात पुन्हा तो सरपटण्याचा आवाज ...ते जे काही होत ते खाली पूर्ण हॉलभर सरपटत फिरत होतं . झोप डोळ्यावर होती तरी जे काही होत ते बघायला चव्हाण शेवटी खाली आले लाइट लावली तर हॉलमधे काही नव्हतं सगळे कोपरे शोधले पण काही भेटल नाही .शेवटी एक चांगली जांभइ देऊन ते परत झोपायला गेले सकाळी ब्रेकफास्टला आले तर गणपा ब्रेकफास्ट लावत होता गणपाला पाहून विचारल "काय रे गणपा बंगल्यात रात्री कसले आवाज येतात काल झोपेच खोबर झाल "हे ऐकून गणपाच्या हातातली प्लेट खाली पडली पण लगेच ती प्लेट उचलत विषय सावरत गणपा म्हणाला "कसलं आवाज बायरुन येत असतील हिकड तस काय नाय म्या.. म्या चाय घेऊन आलो"अस म्हणत तो आत गेला.

ऑफिसला लेट होत होता म्हणून तेही जास्त विषय न ताणता ऑफिसला निघाले .ऑफिसमधे आजही आल्या आल्या तो शिपाई भेटला कोणती तरी फाइल द्यायच्या निमित्ताने आला होता "सायेब तुमी जिथे राहता तिथे सर्व ठीक आहे ना ? "

" हो का ? तू कालही मला असच काही विचारल होतंस तुला एवढी काळजी का माझी ? "

" सायेब तुमी जिथं राहता ती जागा बरी नाय तुम्हांला तिकडे धोका हाय "

" म्हणजे ? "

" तुमच्या आधी दोन सायेब तिथे राहत होते त्यांतले एक दुसऱ्याच रात्री पळून गेले ते परत आले नाहीत आणि दूसरे तर ....दूसरे तर वेडे झाले ते तर अजुनही बरे नाही झाले "

"अरे तुमच्या लोकांच्या अंध श्रध्दा आहेत ह्या अशा अफवा पसरवण्यापेक्षा काही काम करा " एवढ बोलून त्यानी शिपायाला पाठवल पण त्यांची अस्वस्थता कमी होत नव्हती कारण त्यांनी स्वःत ते आवाज ऐकले होते .आज संध्याकाळी ते लवकर घरी आले लगेच किचनमधे जाऊन गणपाला विचारल .

" गणपा .... बाहेर या बंगल्याबद्दल लोक काय काय बोलतायेत इथे नक्की काय प्रॉब्लेम आहे "

" काय नाय मालक आव लोकांकडे कुठे लक्ष देताय "

" ठीक आहे मग आज रात्रीपासून तू माझ्याबरोबर इथे थांबायच... जर गेलास तर याद राख "

" नाय मालक इथं रात्रीच थांबण धोक्याच हाय "

" म्हणजे ?"

" मालक तुमीबी इथं जास्त वेळ राहू नका निघून जावा इथून "

" नीट सांग हे काय चाललय ते "

" मालक इथं फार पूर्वी एक सायेब आलेले ते लई विचित्र होतं म्हणे ते कसल्या कसल्या यिद्या करत व्हते त्यांत सर्पबळी पण दिला होता पण तीच शेवटी यांच्या वर ती उलटली आन ते साप डसल्यानेच मेले त्या नंतर अजून दोन सायेब इथं राहायला आले त्यांना पण त्रास झाला येक तर ठार वेडे झाले ...तुमीबी इथून जावा नायतर तुमचं बी काय खर नाय.... मालक जेवण तयार हाय म्या चाललो " एवढ बोलून तो पटापट तिथून निघून गेला .जेवण झाल्यावर कितीतरी वेळ हे घर जितक्या लवकर होईल तितक्या लवकर सोडावे हाच विचार करत ते हॉलभर फिरत होते इतक्यात त्यांच्या रूम मधून ग्लास फूटण्याचा आवाज आला म्हणून ते लगेच जीना चढून बेडरूममधे बघायला गेले तर तिथे फक्त फुटलेला ग्लास होता इतक्यात त्यांच्या मागून काहीतरी सरपटत बाहेर गेलं त्यांनी बाहेर जाऊन पहिल तर तिथे दुसऱ्या रूमच्या दरवाजात काहीतरी वळवळताना दिसल त्यांनी जाऊन लाइट लावली तर तिथे एक काळा साप वेटोळ करून बसला होता इतका मोठा साप पाहून ते थोडे मागे सरकले तो सरपटत त्यांच्या जवळ येऊ लागला .चव्हाण मागे मागे जात रूममधे घुसले आणि लगेच दरवाजा बंद केला आणि तसेच बेडवर जाऊन बसले .एवढा मोठा साप बघून त्यांना दरदरुन घाम फुटला होता इतक्यात कोणीतरी काही तरी सरपटत त्यांच्या बेडच्या बाजूला येऊन बसलं त्यांनी बघितलं तर तो मघासचाच साप होता पण दरवाजा बंद असताना हा आत कसा आला त्यांना कळत नव्हतं तरीही त्यांनी स्वःतला सावरल आणि धावत जाऊन कोपऱ्यातली काठी घेऊन त्या सापासमोर येऊन थांबले. साप डसनार इतक्यात त्यांनी काठीचे सपासप वार करायला सुरुवात केली तो साप मरेपर्यंत ते वार करतच होते सगळीकडे रक्त पसरल .त्यांच अंगही घामाने डबडबल शेवटी ते दमून तिथेच जमिनीवर बसले आणि तेवढ्यात त्यांना बुडाखाली हालचाल दिसली त्यांनी बघितलं तर ते एका वेटोळ केलेल्या सापावर बसले होते लगेच स्वतःला कसबस सावरत त्याच काठिचे दोन तीन जोरदार घाव त्याच्या डोक्यावर करून त्याला मारल . शेवटी धापा टाकत ते बेडवर बसले आणि बेडच्या बाजूच्या टेबलावरचा पाण्याने भरलेला ग्लास तोंडाला लावला तो पर्यंत घशात काही तरी अडकल्यासारख वाटल म्हणून पानी थुंकल तर तोंडातून पाण्याबरोबर एक सापाच पिल्लू बाहेर पडलं ग्लासात पहिल तर सापाची पिल्ल त्यात वळवळत होती. हातातलं ग्लास त्यांनी लगेच झटकुण दिलं .ते पाणी जमिनीवर पडून ती पिल्ल त्यात वळवळत होती ते पाहून तर ओकारीच यायला लागली .इतक्यात पंख्यावरून त्यांच्या गळ्यात काही तरी पडलं तो अजून एक साप होता त्याला बेडवरच झटकुण मारायला काठी उगारनार तोच कोपऱ्यातून अजून दोन साप फणा काढून बसलेले होते त्यात खिडकीतून अजून दोन साप आत आले चारही बाजूला फक्त साप दिसत होते .सगळे हळूहळू त्यांच्या जवळ सरकू लागले चव्हाण मागे जात जात कोपऱ्यात येऊन पोचले. आता कुठे पळायला ही जागा नव्हती समोर फक्त सापच दिसत होते सगळे हळुहळु त्यांच्या पायाजवळ येऊन पोचले त्यांना पायावर काहीतरी बुलबुलिट स्पर्श झाला मागून एक साप पायावर चढला होता तो जोरात पाय झटकुण फेकला .तेवढ्यात दुसरा अंगावर चढला त्यालाही अंगावरून झिडकारला पण चव्हाण पुर्णपणे त्यात अडकले ..........

दुसऱ्या दिवशी बंगल्यासमोर वेड्यांच्या इस्पीतळातून एक गाडी येऊन थांबली ....चव्हाण ओरडत होते अंग झटकत होते स्वतःला ओरबाडत होते ......ते गेल्यानंतर पुढचे काही दिवस तो बंगला बंद राहीला .

नंतर पुन्हा एक नवा अधिकारी चव्हाणांच्या बदली आला त्याचे सुरुवातीचे काही दिवस चांगले गेले नंतर पुन्हा सुरू झाला तोच सरपटण्याचा आवाज .....

शिकार

आजही अगदी कडाक्याची थंडी पडली होती . दूरवर कुठेतरी कुत्र्याच्या विव्हळन्याचा आवाज येत होता . पिंपळाच्या झाडावर बसून घुबड चेकाळत होत .पण जंगल मात्र शांत होत कदाचित नव्या शिकारीसाठी .

जंगलातल्या रस्त्याच्या मधोमध एक सफेद गाडी उभी होती . पुढचा टायर पंक्चर झाल्याने पुढे जायची शक्यताच नव्हती . गाडीच्या बाजूला एक तरुण मुलगी उभी होती . स्नेहा तीच नाव . लाल पंजाबी ड्रेस,निळेशार डोळे,गोरापाण वर्ण ,कानात झुमके कपाळावर छोटीशी टिकली . थंड वार्यावर हलकेच उडणारे केस. ती रस्त्यावर उभी राहून वाट बघत होती कोनाच्यातरि लिफ्टची . पण कितीतरी वेळ कोणीच आल नव्हत . गेले काही दिवस जंगलातील वर्दळ कमी झाली होती . काही लोकांच्या मते जंगलात म्हातारयाच भूत दिसत होत काहींच्या मते तो पांडबाचा आत्मा होता तो .तसच जंगलात आक्सिडेंट ही वाढले होते त्यामुळे लोकांच येन जाण कमी झाल होत . त्यामुळे तिला आता लिफ्ट मिळणे कठिन होतं . भरपूर वेळाने अचानक अंधारातून गाडीचा आवाज येऊ लागला . आणि दूरवर दोन हेड लाइट दिसू लागल्या अंधार कापत एक लाल सुमो स्नेहाजवळ येऊन उभी राहिली . आत एक स्थूल म्हातारा माणूस बसला होता जोरात गाणी चालू होती .कदाचित हिला लिफ्ट हवी कळली असावी म्हणून त्याने थांबविली असेल . इतक्या सुनसान जंगलात अचानक एखादी गाडी येऊन थांबणे म्हणजे स्नेहासाठी नवलच होते .पण काय करावे हे तिला कळत नव्हते . तेवढ्यात" गाडीत बसायचय का ? तर बस नाहीतर मी जातो "असा घोगरा आणि उर्मत आवाज आला . शेवटी नाईलाजाने ती तयार झाली आणि बॅग घेऊन बसायला जाणार तेवढ्यात तिचे लक्ष ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर गेले तिथे लांब सुरा आणि एक मोठी बंदूक होती हे पाहून तर स्नेहा दचकून मागे सरकली . पुढे जायची कदाचित तिची हिम्मत होत नसावी . पण अजून काही पर्याय ही नव्हता . इतक्या रात्री सुनसान जंगलात अस उभ राहणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा होता कधी काय होईल सांगता येत नव्हत त्यात गाडी मिळण्याची शक्यता नव्हती . शेवटी नाईलाजाने स्नेहा गाडीत मागच्या सीटवर बसली . गाडीत बसतात एक मांसाचा वास नाकात शिरला .गाडीच्या सीट वर लाल डाग पडले होते कदाचित रक्ताचे असतील.???...... . तिने लगेच हा विचार झटकुन टाकला .गाडी सुरू झाली . गाडी रस्त्यावरून मधे मधे धक्के खात जात होती . जुना रस्ता होता हे स्पष्ट जाणवत होत . तो म्हातारा एकटक समोर बघून अगदी यंत्रासारखा गाडी चालवत होता .गाडीत अजूनही तो मांसाचा वास भरून राहिला होता उलट अजून वाढला होता . आजुबाजुला एकही वाहन दिसत नव्हत . सगळी कडे सुनसान होत . तिने न राहून शेवटी विचारलच . " काय हो हे जंगल असच सुनसान असत का ? "समोरून काहीच उत्तर नाही .तो म्हातारा अजूनही एकटक गाडी चालवत होता .

"अहो बाबा इकडे रहदारी का नाही ?तीने विचारलं

"रामा ...रामा नाव माझ.. "अशाच उर्मट उत्तराची अपेक्षा होती आणि ते आलं ....

." अहो पण हा रस्ता असाच सुनसान असतो ? स्नेहा खिडकीतून बाहेर पाहत बोलली .

" हिकड आधी लई लोक यायची फिरायला . शहरात जायला तर हा शॉर्टकट होता . पण मधी अशा गोष्टी घडल्या आणि लोक इथं फिराकायचे बंद झाले "रामा गाडी चालवत बोलत होता .

" पण अस काय झाल होत ? स्नेहाने विचारलं .

त्याने सांगायला सुरुवात केली " ह्या रस्त्याने आधी भरपूर लोक यायची जायची . जंगलच होत म्हणून काही हींडायला ,फिरायला ,शिकारीला बी यायची . इथंच येक पांडबा नावाचा म्हातारा आन त्याच बीऱ्हाड रहायचं .त्याचा ढाबा होता जंगलात येकच चांगल खायच ठिकाण . तवा हिकडचे रस्ते माणसांनी भरलेले असायचे . पण नंतर नंतर इथं लय मेलेलि जनावर मिळाया लागली दिवसे दिवस हे वाढू लागल . इथं जनावरांच्या चामड़ीची तस्करी सुरू झाली .पयल पयल कोणाला काहीच कळत नव्हत. मोठी टोळी व्हती आन पोलीस बिचारे पकडून कोणाला पकडनार ? टोळी भरपूर मोठी होती . ..पण पांडबाला या होणाऱ्या . गोष्टीच फार वाईट वाटत होत . जंगलातच वाढला होता ना जनावर अशी मरताना कसा बघणार . एके दिवशी रात्री एक ट्रक आणि दोन गाड्या त्याच्या ढाब्यासमोर येऊन थांबल्या आन काही माणसं उतरली . त्याच्या ढाब्यावर जेवायला . तेवढ्यात पांडबाला काही दिसल त्यांच्या कपड्यांवर रगताचे डाग होते . म्हणून पांडबाला संशय आला .म्हणून त्यांची नजर चुकवून त्याने ट्रकमधी पाहिलं तर आत नुकतीच कापलेली जनावरांची चामडी होती . त्याला जे समजायच होत ते समजला . आणि त्याने त्यांच्या जेवणात गुंगीच औषध टाकून त्यांना दिल आणि बेशुध्द केलं . नंतर पोलीसांना बोलवून त्यांना पकडून दिल . पण त्याचे परिणाम शेवटी त्याने भोगलेच . त्यांनी त्याच्या ढाब्याला आग लावून दिली त्यातच त्याच्या सम्पूर्ण बिर्हाडाला जाळून टाकलं . "

" पण मग काही पोलीस चौकशी वैगरे नाही झाली "कावेरीने आश्चर्याने विचारलं

" झाली ना ..त्याची पोरगी होती ना तीच सासर शहरात होत चांगली शिकलेली होती म्हणे ..ती आली होती कंपलेंट करायला .....पण तीच नंतर काही झाल कोणालाच कळल नाही तिलाबी मारलं असलं "

" पण अस ऐकलय की पांडबाच भूत सगळ्यांना दिसत . त्यानेच त्या तस्कराना मारलय ."कावेरीने शंकाn बोलून दाखवली

" हाहाहा ही अफवा म्याच पसरवली होती. ते तस्कर दुसर तिसर कोण नसून आम्हीच आहे "

" तुम्हाला भीती नाही वाटत ?

" मला कशाची भीती? त्या पांडबाला आम्हीच मारलं तो जिवंत असताना माझ काही वाकड नाही करू शकला मेल्यावर काय करणार ? रामा बेफीकीरीने बोलत होता .

" पण अस ऐकलय की तुमच्या म्होरक्याला त्यानेच मारलय?

" आमचा म्होरक्या त्याला तो कुटे मारणार त्याचा गळा तर मीच चिरला होता "रामा मिश्किलपणे बोलत होता .

का ? तिने विचारलं

"मेहनत करायची आम्ही पैसे लाटनर तो टाकला मारून ...लोकांना वाटल पांडबाच्या भूताने मारलं .

"म्हणजे तुम्हाला भीती नाही वाटत ?

"हाहाहा भीती वाटत असली तर आलो असतो का चामड़ी न्यायला " रामा पुढे पाहत हसत हसत बोलत होता .

तेवढ्यात तीच लक्ष मागे गेल मघापासून अंधारात काय होत ते आता दिसल एक दोन मारलेली जनावर पडली होती .ते मघासचे रक्ताचे डाग कसले आहेत हे आता स्नेहाच्या लक्षात येत होत .

" पण मी तर ऐकलंय की मागच्याच आठवड्यात एका तस्करांच्या टोळीची हत्या झाली .ती हत्या होती की कोणत्या प्राण्यांने हल्ला केला ते अजून कळल नाही ."

" हम्म तेच तर कळत नाही ना जर खून म्हणावा तर ज्याने केला तो नीटही करू शकला असता पण नाय त्यांचे डोळे फोडले होते ...गळा चिरला होता .असा हल्ला कोणी जनावर पण करत नाय ." रामा एका हाताने दाढी खाजवत बोलला .

"ते खून पांडबाच्या च्या मुलीने केले "स्नेहा बोलली .

" काय ?.......कस काय ?

"जेव्हा पांडबाचा खून झाला तेव्हा ती आली होती तक्रार करायला पण त्या लोकानी तिलाही मारून टाकल."

" पण हे सर्व तुला कस माहीत ? रामाने विचारल .

इतक्यात एक कूबत वास त्याच्या नाकात शिरला .

" कारण ..........ती मीच आहे ......कावेरी बोलली तिचा आवाज मगास पेक्षा वेगळा येत होता तो घोगरा झाला होता .म्हणून रामाने आरशातून मागे पाहिलं तर तिकडे मघाशी जी मुलगी होती तिच्या जागी आता वेगळंच काही होत .चेहऱ्यावरचा अर्धा भाग कापलेला होता त्यामुळे एकच डोळा दिसत होता एक डोळा फुटला होता डावीकडून जबडा कापलेला होता .त्यामुळे दात दिसत होते .गळ्यावर दोन चाकुच्या खूणा दिसत होत्या त्यातून रक्त गळत होत ते बघून रामाचा थरकाप उडाला गाडी वरच नियंत्रण सुटू लागल गाडी वेडी वाकडी वळण घेत चालू लागली .तिचा एक हाथ पुढे आला आणि त्याचा पंजा रामाच्या गळ्यावर आला आणि पाच नखे रामाच्या मानेत घुसली रामाच्या तोंडातून शेवटची किंकाळी निघाली आणि गाडी अंधारात पुढे जाऊन झाडाला धडाकली .आजही कडाक्याची थंडी होती दूरवर कुत्री विव्हळत होती . आज पुन्हा जंगलात एक सफेद गाडी उभी होती आणि बाजूला एक मुलगी वाट पहात होती ..... कदाचित नव्या "शिकारीची"

बेट

सम्या(समीर),रव्या(रविंद्र),पक्या(प्रकाश),गण्या(गणेश)हे चौघे इंजीनियरिंगच्या शेवटच्या वर्षाला होते.एकदा हे वर्ष पूर्ण झाल की मग पुढचं शिक्षण किंवा नोकरी सुरू एकदा हे सर्व सुरू झाल की कामाच्या गडबडीत कधी भेट होईल की नाही माहीत नाही. नुकतीच दिवाळीची सुट्टी सुरू होणार होती .सुट्टीतल पूर्ण प्लॅनिंग चौघे होस्टेलच्या रूममधे बसून करत होते .

" सम्या मी काय म्हणतोय या सुट्टीत घरी जाण्यापेक्षा कुठेतरी मस्त चार पाच फिरुन येऊया ."रवी स्टडी टेबलवर पुस्तक वाचत बसला होता तो पुस्तक बंद करत बोलला .

" मी पण तेच म्हणतोय पुन्हा कधी भेटू सांगता येत नाही ."समीर रवीकडे पाहत बोलला .

" गोव्याला जाऊया ? " गण्याने सुचवलं .

" चार वेळा जाऊन आलोय " समीर बोलला .

" लोणावळा ? " गण्या.

" माझ गाव तेच आहे तिकडे जाण्यात काय मजा ? " रवी बोलला .

" शिमला कस वाटतय ? "समीरने सुचवलं .

" एक नंबर ..." गण्या .

"मस्तच ... "रवी .

" मग शिमला फाइनल ओके ? "समीर सगळ्यांकडे पाहत बोलला .

प्रकाश हात डोक्याखाली घेऊन पायावर पाय टाकून मस्तपैकी बेड पडला होता .

" तुम्ही तिघे जा मला काय जमणार नाही ." एका कुशीवर परतत प्रकाश बोलला .

" जमणार नाही म्हणजे ? "समीरने विचारलं

" का पण ? "गण्या .

" अरे रामचा म्हणजे काकांच्या मुलाचा साखरपुडा आहे आणि आठवड्याभरात लग्न म्हणून .."प्रकाश बेडवर उठून बसत बोलला .

" आरे काय यार तूझ्याशिवाय काही मजा नाही येणार ."रवी .

" चल ना काय नाटक करतोय .." गण्या .

" अरे घरातल लग्न आहे आणि मी चुलत भाऊ बाहेर ..मला नाही जमणार तुम्ही तिघं जाऊन या ना ." प्रकाश निराशेने बोलला .

" सोड... जाऊ तर एकत्र जाऊ नाहीतर मग राहू देत ."समीर डोक पुस्तकात खुपसत बोलला .

" अरे तुम्ही एंजॉय करा ना " प्रकाश .

" सोड राहू दे " म्हणत रवीनेही आपल लक्ष पुस्तकात टाकलं .

" ए एका मी काय म्हणतोय माझ्या घरापासून तीन चार किलोमीटर लांब आमच एक जूना वाडा आहे तिथे सध्या कोणी नसत .आपण चौघे जाऊया ना तिथे ..मस्त मजा करू "प्रकाश चुटकी वाजवत बोलला .

" आयडीया चांगली आहे " समीर .

" मग फाइनल तिकडेच जाऊया " रवी .

ते चौघेही प्रकाशच्या स्विफ्टने गावाला आले पहिल्या दिवशी साखरपुडा पार पडला. लग्नाला अजून चार दिवस बाकी होते म्हणून दुसऱ्या दिवशी पहाटेच त्या वाड्याकडे निघाले थंडीचे दिवस होते मस्त धुके पडले होते .वाड्याच्या दरवाजातच नरू त्यांची वाट पाहत उभा होता. नरू वाड्याचा केअर टेकर ,नोकर सगळंच.वाडा तसा जुन्या पद्धतिचा होता. मोठा दरवाजा ,भिंतीवर प्रकाशच्या आजोबा पंजोबांचे फोटो होते . एका भिंतीवर दोन तलवारी आणि दोन खंजीर लावले होते . रवी सगळ्यात आधी त्या हत्यारांकडे धावला .एक खंजीर हातात घेतला त्याला आधीपासून अशा हत्यारांची आवड होती

" पक्या हा खंजीर जबरदस्त आहे रे मी घेऊ का ? " रवी त्या खंजीरांकडे पाहत विचारत होता .

" नाही हा.... आजोबांचा आहे तो ... ठेव " प्रकाश .

रवीने निराशेने शेवटी तो खंजीर ठेवला .पूर्ण वाडा ,मागची बाग फिरेपर्यंत दहा वाजले नंतर विहिरिवर अंघोळ करून नरूच्या हातचं गरमागरम जेवण जेउन मस्त पैकी सगळ्यांनी ताणून दिली उठे पर्यंत पाच साढ़े पाच वाजले थोडा वेळ पत्ते वगैरे खेळून झाल्यावर जेवायची वेळ झाली .थंडी मस्त पडली होती गण्या आणि रवीला मटन खायची हुक्की आली. शनिवारच वाड्यात खायला मनाई होती म्हणून चौघेही मेन रोड वरच्या ढाब्यावर जायला निघाले .थंडी होती म्हणून प्रत्येकाच्या अंगावर स्वेटर ,मफलर होती .थंडीत सर्वानी मस्त गरमागरम तंदूर ,कबाबवर ताव मारला गप्पा टप्पा करत त्यांना तिकडेच अकरा सव्वा अकरा वाजले रात्र भरपूर झाली म्हणून ढाब्यावर तुरळक गर्दी होती म्हणून टाइम पास करत तिकडेच बसले .

" पक्या हा ढाबा नेहमी एवढा चालतो ? " गण्याने आसपास पाहत विचारलं .

"मग काय मेन रोड आहे ना गर्दी असते नेहमी इथून मधून एक शॉर्टकटसुध्दा आहे पण तिथे रात्रीच कोणी फिरकत नाही " प्रकाश

"का रे ? "

"तिथे आत्मे पिशाच्चाचा वावर असतो . " प्रकाश सहजपणे बोलून गेला .

" काय ?कोण असत ? "समीरने भुवया उंचावत विचारलं .

" अरे पिशाच्च वावरतात तिथे "प्रकाश .

हा हा हा ....समीर जोरात हसू लागला .

" हसायला काय झाल ?..मी सिरीयसली बोलतोय "

" ए कोणी हसू नका सिरियस सिरियस ..हा.... मग ती काय करतात घाबरवतात ,पकडतात ,की सरळ मारतात ." समीर प्रकाशची थट्टा करत बोलत होता .

"हा काय मस्करी करायचा विषय आहे ."प्रकाश रागवत बोलला .

" अरे नाही पण त्यांनी आता पर्यंत किती लोकांना मारलय काही रेकॉर्ड वैगरे ठेवलाय ?हाफ सेंचुरी तरी झाली का ? "

" मस्करी बस झाली ......सगळेच आत्मे उपद्रवी नसतात "

" हो ...मग ते काय फक्त इंट्रोडक्शन देऊन निघून जातात ."

" तूझा नक्की प्रॉब्लेम काय आहे ? "प्रकाश .

" अरे भूत बीत काही नसतं तुमच्या गावठी लोकांच्या कल्पना आहेत सगळ्या .."

" मी गावठी ?मग तू काय मोठ्ठा.......... "अस म्हणत तो त्याच्या रोखाने उठला गण्या आणि रवीने त्याला शांत केले

" ठीक आहे तु माझी मस्करी करतोयस आपण तीन दिवस इथे आहोत तिन्ही रात्रि रात्रीचे तीन तास तू तिथे थांबायचस जर घाबरला नाहीस तर मी तुला काय मागशील ते देईन ." प्रकाश बोलत होता .

" बेट... ? " समीर .

" हो बेट "

" मग मी पण थांबतो सम्याबरोबर पण आम्ही मागू ते देशील ? रवीने प्रकाशच्या रोखाने पाहत विचारलं .

" नक्की " प्रकाश तयार झाला .

" तो खंजीर देशील ? " रवीने विचारलं .

" दिला.... बेट जिंकून तर दाखव " प्रकाश

ते चौघेही गाडीने त्या रस्त्याजवळ आले .प्रकाश आणि गण्या त्या दोघांना सोडून निघुन गेले समीर आणि रवी थोडा वेळ तिथे थांबले रस्ता तसा शांत होता आजुबाजूला झाडी होती .थंडीचे दिवस होते म्हणून धुकं पसरल होत .एक दीड तास दोघ गाणी ऐकत टाइम पास करू लागले .

"सम्या चल ना बाजूला जाऊन येऊया" .

" बाजूला ? " समीरने कानातले इअर फोन काढत विचारलं

" अरे लघवीला थंडी भरपूर आहे "

"बर चल "

रस्त्यापासून थोड आत झाडीत गेल्यावर रवीला रस्त्यावरून गाडी गेल्याचा आवाज आला

" सम्या तुला कोणत्या गाडीचा आवाज आला काय रे ? "

" काय ?...चल काहीतरीच भास झाला असेल तुला "

" असेल ...कदाचित "

त्या दिवशी तिथे थांबून काहीच निष्पन्न झाल नाही . दुसऱ्या दिवशीही

प्रकाश आणि गणेश त्या दोघांना तिथे सोडून ढाब्यावर गेले .तिथे थांबून एक दीड तास झाल्यावर त्या दोघांना गाडीचा आवाज येऊ लागला आणि त्यांच्या डोळ्यांसमोरून एक सफेद बॅगस्टर गाडी गेली .

" हे बघ इथून लोक आरामात जातायेत आणि पक्या बोलतो रात्रीच कोणी फिरकत पण नाही " रवी गाडीकडे पाहत बोलला .

"अंधश्रध्दा सगळ्या दुसर काय ?..सोड ......." समीर .

या दिवशीही काही निष्पन्न नाही झाल पण परत वाड्याकडे जाताना रवी आणि समीरच्या चेहऱ्यावर एक मिश्किल हसू होतं पण प्रकाशचा चेहरा मात्र हीरमूसला होता .

" काय रे सम्या कोणतरी आपल्याला काल काय बोलत होतं ?त्या रस्त्यावर भूत असतात "

" भूत नाही रे पिशाच्च ,आत्मे.."समीर रवी दोघे प्रकाशची टेर उडवत होते .

रवी :हा हा हा

" बास .....बस झाली मस्करी उद्याचा एक दिवस बाकी आहे अजून .."प्रकाश त्यांना गप्प करत बोलला .

तिसऱ्या दिवशीही प्रकाशचा उदास होता म्हणून तो आणि गणेश वाड्यावरच थांबले होते .रवी आणि समीर दोघेच गाडी घेऊन त्या जागी आले आणि जवळच्याच एका दगडावर येऊन बसले .थंडी भरपूर होती रवीने एक सिगरेट शिलगावली आणि झुरके घेऊ लागला .

" सम्या तुझा ह्या असल्या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही का रे ? "

" कोणत्या ? "

" आरे ह्याच आत्मे ,भूताटकीच्या जागा वैगरे असतात या वर

" अजिबात नाही "

" का ? "

" अरे भाकड कथा आहेत सगळ्या... लोकांच्या कोणती आश्चर्यकारक गोष्ट दिसली की लगेच त्याचा संबध भूताटकिशी जोडायचा "

" फॉर एग्ज़ेंपल " रवी .

समीर बोलू लागला "आमच्या गावात एक म्हातारी होती एकटीच राहायची तिला सगळे चेटकीन म्हणायचे .....का माहितीय ?..तीच घर स्मशानाजवळ होतं तिच्या घरा बाहेर कधीकधी अस्थि वैगरे सापडायच्या लोकांच्या मते ती जादूटोना करायची आम्ही एकदा गावी गेलो असताना बाबांना ही गोष्ट कळली त्यांचा अशा गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता त्यानी या प्रकरणाचा छडा लावण्याचं ठरवलं आणि त्यांनी तपास केला तेव्हा कळल रात्रीच स्मशानात कोल्ह्या कुत्र्यांचा धुमाकूळ चालायचा त्यांच्या कडूनच त्या अस्थि तिच्या घरापर्यंत पोहचायच्या ....माझे बाबा होते म्हणून ती वाचली नाहीतर काही दिवसांनी गावातल्या लोकांनी तीला गावातून हाकलून पण दिल असत ....तू अस का विचारलस तुला ह्या गोष्टींवर विश्वास आहे ? "

" माझा विश्वास नाही पण आई नेहमी सांगायची माझ्या मोठ्या मामाबद्दल माझे मोठे मामा पहिलवान होते कितीतरी कुस्ती जिंकून पंचक्रोशित नाव कमावल होतं .एके दिवशी त्यांच्या बैलगाडीत कोणीतरी हळदी कुंकू लावलेले लिंबू सापडले त्यानंतर काका अगदी विचित्र वागू लागले त्यांना भयानक स्वप्न पडू लागली संध्याकाळ झाली की ताप यायचा डोळे लाल व्हायचे .खूप वैद्य केले पण अजिबात फरक नाही उलट दिवसेंदिवस त्रास अजून वाढू लागला नंतर तर त्यांनी जेवणसुध्दा बंद केल एका खोलीच्या कोपऱ्यात अंधार करून बसून रहायचे .तब्येत पूर्ण ढासळली जराश्या आवाजाने ते घाबरायचे .आजीला हा काय प्रकार आहे ते कळल आणि तिने काकांना ग्राम देवतेच्या मंदिरात नेऊन पूजा केली तिथेच काका बेशुध्द झाले आणि उठले ते सरळ वीस तासांनी पण त्या दिवसानंतर त्यांना पुन्हा कधी त्रास झाला नाही .त्यांच्या कोणीतरी करनी केली होती "

" म्हणजे तूझा या गोष्टींवर विश्वास आहे तर ? " समीरने तोंड वाकड करत विचारलं .

" थोडा फार ..."

" मग कशाला आलास इथे माझ्याबरोबर ??? "

" तू तो खंजीर बघितलास ना. मला लहानपणा पासून अशा हत्यारांची आवड आहे मला काहीही करून तो हवाय "

" तू पण ना ...." समीर मान हलवत बोलला .

" चल आता तीन तास तर झाले अजून किती थांबणार निघूया चल ...." रवी बोलला .

" ह्या पक्याने भूत आहे भूत आहे म्हणून डोकं खाल्लं होतं तीन दिवस थांबलो काहीतरी होतं का ?

" मला जाऊन पहिला त्याचा चेहरा बघायचाय बेट हरेल म्हणून येताना किती उदास होता बघितलंस ना "

रवी आणि समीर गाडीत बसून वाड्याकडे यायला निघाले त्यांच्या गाडीच्या बाजूने वेगाने एक बॅगस्टर गेली .

" ही कालचीच गाडी आहे ना रे ? "समीरने त्या गाडीकडे पाहत विचारलं .

" हो ...तीच वाटतेय "

रवी आणि प्रकाशची गाडी आरामात त्या रस्त्यावरून चालली होती थोडं पुढे गेल्यावर दिसल की दोन लोकं रस्त्यावर भांडत होती. एका बुलेटने त्या मगासच्या बॅगस्टर गाडीला ठोकल होतं. त्या दोघांतला एक तरुण सफेद बंडी आणि लेँगा घालून होता आणि दुसरा थोडा स्थूलसा सदरा आणि विजार घालून होता त्यांच्या भांडनाच रुपांतर आता हाणामारीत झाल .त्या दोघांची हाणामारी बघून रवी आणि समीर दोघेही गाडीच्या बाहेर आले ह्यांच्या भांडणात पडू की नये हे त्यांना कळत नव्हतं.दोघानी एकमेकांना जमिनीवर पाडलं आणि लगेच त्या ऐकाणे आपल्या लेँग्याच्या खिशातून चाकू काढून दुसर्याच्या मानेत दोनदा खुपसला चाकू घुसल्याबरोबर सदरा विजार घातलेल्याची हालचाल कमी झाली. चाकू खुपसनारा उठून त्या एकमेकांना आपटलेल्या गाड्यांजवळ आला आणि आपली पडलेली बुलेट उचलू लागला तेव्हा तो जखमी माणूस एका हाताने मानेवरची जखम दाबून उठला.तिकडचाच जवळचा दगड उचलला आणि त्याच्या मागोमाग येऊ लागला त्या चाकू खुपसनार्याने आपली बुलेट उचलली आणि तिच्यावर बसणार इतक्यात मागच्याने त्याच्या डोक्यात तो दगड घालून त्याला पाडला आणि तो बुलेटवाला मरेपर्यंत डोक्यात दगड घालतच राहिला नंतर दगड बाजूला फेकून धडपडत आपल्या गाडीजवळ येऊ लागला त्याच्या मानेतुनही भरपूर रक्त गेल होतं त्याच्यात पुढे चालण्याचे त्राणच राहिले नव्हते तोही तोल जाऊन तिकडेच पडला.रवी आणि समीर हे सर्व पुतळ्यासारखं उभ राहून पाहात होते त्यांनी पहिल्यांदा असे खून होताना पाहिले होते .

" सम्या चल सटकुया इथून .."रवी गाडीकडे जात म्हणाला .

" वेडा आहेस का ?ह्यांना हॉस्पिटलला न्यायला हव .तो सदरेवाला जिवंत आहे वाटत चल बघू .."

" मी नाही तूच जा "

समीर त्या सदरा घातलेल्याच्या जवळ आला अंगाला हात लावून पाहिलं त्याचा श्वास बंद पडला होता आणि अंगही पूर्ण थंड लागत होतं .

" अरे हा तर पूर्ण थंड पडलाय "तो रवीकडे पाहत म्हणाला .

" सोड त्याला चल सटकूया इथून "म्हणत रवी गाडीत बसला .

रवी आणि समीर दोघेही जमेल तितक्या वेगाने गाडी पळवत होते .

" माणूस मेल्यावर त्याची बॉडी थंड व्हायला वेळ लागतो त्याची बॉडी इतक्या लवकर कशी थंड पडली " समीर गाडी चालवत बोलत होता .

" त्या बद्दल काही बोलू नकोस मला भीती वाटतेय आपण घरी जाऊन बोलू "

गाडी शेवटी वाड्याजवळ आली प्रकाश आणि गणेश गाडीचा आवाज ऐकून बाहेर आले .थंडी भरपूर पडली होती तरीही समीर आणि रवी घामाने डबडबले होते .गाडीतुन उतरून धावतच त्यांच्या जवळ आले

" काय रे इतके घाबरायला काय झाल ? " गण्या .

" मी बोललेलोना तिकडे नका जाऊ शेवटी घाबरलात ना "त्यांची अवस्था पाहून प्रकाश बोलला .

" अरे तिकडे भूत बीत काही नाहीये पण आम्ही जे पाहिलं ते त्याच्या पेक्षापण भयानक आहे " रवी .

" अरे त्या रस्त्यावर दोन खून झाले तेही आमच्या डोळ्यासमोर ..."समीर

" काय खून ??? " प्रकाश .

" हो खून " समीर .

" आपल्याला पोलीसांना कळवायला पाहिजे " प्रकाश .

" ए चल कशाला फालतूची झंझट.. "रवी त्याला अडवत बोलला .

" झंझट काय त्यात ?...पक्या बरोबर बोलतोय आपण पोलीसांना सांगितल पाहिजे "समीर बोलला

"आणि इकडचे पोलीस काकांच्या ओळखीचे आहेत चला काही नाही होणार "

चौघेही चौकीत आले समोरच जमदाडे साहेब बसले होते ते त्यांना येऊन भेटले .

" हं बोला काय तक्रार आहे ? "त्यांनी सर्वांकडे पाहत विचारलं

" तक्रार नाहीय " प्रकाश .

" मग ? "

" दोन खून झालेत आम्ही आमच्या डोळ्यांनी पहिलय " समीर

" खून .....कुठे घडलं हे ? "

" त्या रस्त्यावर " समीर

" कोणत्या रस्त्यावर ? "जमदाडे आवाज चढवत बोलले .

" माळावरच्या रस्त्यावर " प्रकाश .

" माळावरच्या का ?बर ......"

" हो हो त्याच " समीर .

" एकाचा खून मानेत चाकू खूपसुन आणि दुसऱ्याचा डोक्यात दगड टाकून झाला असेल ?? " जमदाडे सहजपणे बोलून गेले

" हो हो " रवी .

" एका कडे बूलेट आणि दुसऱ्याकडे बॅगस्टर असेल ? "

" हो अगदी बरोबर " समीर .

" एकाने बंडी आणि लेँगा दुसऱ्याने सदरा विजार घातली असेल ?? "

" हो अगदी बरोबर पण हे सर्व तुम्हाला कस माहीत ?आता थोड्या वेळा पूर्वी तर हे घडलय " समीरने न राहवून विचारलं .

" सांगतो सांगतो ....ह्या खूनांचा पंचनामा मीच केला होता "

" होता..... म्हणजे ? "समीरने विचारलं .

जमदाडे मागे खुर्चीत टेकून बोलू लागले ." वीस वर्षा पूर्वीची गोष्ट आहे हे दोघं काका पुतण्या होते पण प्रॉपर्टी वरून वाद शेवटी वेगळे झाले पण दुश्मनी संपली नव्हती .त्या दिवशी रात्री दोघांच्या गाड्या एकमेकांना आपटल्या असतील पण एवढ्याश्या कारणा वरून भर रस्त्यात मारामारी करून एकमेकांचे मूडदे पाडले अस म्हणतात मरतानासुध्दा ज्यांची सूडबुद्धि संपत नाय त्यांचा आत्मा असाच भटकतो त्यांची पण दुश्मनी संपली नसेल म्हणून ते अजूनही रात्रीचे लोकांना दिसतात तुमच्या आधीही भरपूर लोकांना दिसलेत म्हणून तिथे रात्रीच कोणी फिरकत नाही "


Continue reading this ebook at Smashwords.
Download this book for your ebook reader.
(Pages 1-49 show above.)